जीवनातील ध्येयाचे शिखर सर करीत असताना
संकटांचे वारे वाहतील
अडथळ्यांच्या खाच-खळग्यांतून वाटा चढावाच्या भासतील
बेरजा करू पहाल तर वजाबाक्या होतील
आणि जरा हसू पहाल तर डोळे ओले होतील...
वाटेत दम लागला तर दम घ्या क्षणभर...
पण नका सोडू धीर...
मित्रांनो !
रात्रीच्या गर्भातूनच होतो शेवटी उषः काल
जगी कोण नाही असा जो पाही दिक्काल
वाटेल सुळका जरी दूरवर
कोणास ठाऊक पण असेल एका हातावर...
चिकटून राहा ध्येयाशी मार्गक्रमण करताना
भय-शंकेची वटवाघुळे माथ्यावर भिरभिरताना...
अपयश हे अल्प-यश नसे शेवट जीवनाचा
वादळ-वाटांवरती दिवा जळू दे आशेचा...
आणि मग
भले कोसळू दे कडे संकटांचे
निश्चल,अविचल उभे ठाका
आणि धीर मात्र सोडू नका,
कारण असे केले तर
अंतिम विजय तुमचाच आहे!!!